परत आली चतुर्थी , परत आल्या आठवणी!

विदेशात राहण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणाल तर घरातले सण साजरा करता येत नाही. बालपणीच्या आठवणी मात्र लपकन येऊन मन भरवून जातात.
आमच्या कॉलोनीत गणेश चतुर्थीचा खूप उत्साह असायचा. बाप्पांच्या स्वागताची तयारी तर महिन्या आधीच सुरु व्हायची . फॅन्सी ड्रेस, नृत्य, चित्रकला, नाटक अश्या कित्येक स्पर्धा असायच्या. आम्हा मुलांची तर गम्मतच व्हायची. बिल्डिंगच्या गच्चीवर मोठी मुलं रोझ रात्री नाटकाची प्रॅक्टिस करायची, कोणालाही तिथे जाण्याची परवानगी नव्हती. Surprise element साठी. पण आम्ही पोरटं थोडंच गप्प करून बसणार होतो. गच्चीवर लपून बसायचो आणि दादा ताई यांची प्रॅक्टिस बघायचो , त्यांनी बघितलं की पळून जायचो.
अश्या एका रात्री, मला एका दादानी बघितलं . मी धावणाराच होते पण तो म्हणाला, काय गं लपते काय, इकडं ये, तू करशील का आमच्या बरोबर नाटक?? मी तर सातव्या आभाळात पोचले. मला नाटकात रोल मिळाला होता!
बारा वर्षाची मी, पण रोल कोणाचा तर कुचकट आजीबाईचा ! नाटक झाले कौतुक पण झाले . नाटकाच्या दोन तीन वर्षानंतर सुद्धा कॉलोनीतली लोक आठवण काढायची- काय गोड होती ती कुचकट आजी 🙂
तेव्हा कळलं नाही, नंतर मात्र लक्षात आलं की का माझ्यावर एवढे मेहेरबान होते ते ताई दादा, कुठल्या ही ताईला आज्जी व्हायचं नवहतं ! पण मला झर हिरवे कपडे घालून वृक्षासारखे उभे राहायला सांगितलं असतं तर ते ही मी ख़ुशी ख़ुशी केलं असतं , मला माझ्या दादांनी विचारलं तेवढंच खूप होतं. आपलं तसं असतं. लहान असताना मोठे होण्याची घाई आणि आता, त्या ताणमुक्त जीवनाची ओढ.
आज परत आले आहेत बाप्पा देशात. माझ्या Youtube वर गणेश आरती सुरु आहेत. हिंदीत म्हणतात ना “गीत से गोविंद कि प्राप्ती” – तसला काही प्रपंच सुरु आहे माझा!

प्रिय बंधू भगिनी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा . आपणांस बुद्धी, स्वास्थ्य, श्री लाभो!

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s